Book Whisper

@Weekend वाchan

I’m Varsha Patil, an avid reader and Assistant Police Sub-Inspector with the Maharashtra Police Department. I love sharing book reviews that capture the author’s intent and offer my honest opinions helping readers find meaning in stories amidst the chaos of everyday life.

समाज सुरक्षित आणि बिनधास्त झोपतो, सण उत्सव साजरे करतो, रात्री अप रात्री एकट्याने प्रवास करतो कारण… तो जागा असतो कर्तव्यावर… तो जागा असतो जबाबदारीवर…तो जागा असतो सुरक्षिततेवर….. तो म्हणजे पोलीस!

पोलीस म्हणजे वेळेच्या चौकटीत न मावणारे जग.कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नव्हे तर ती एक जीवन पद्धती आहे. जिथे वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, आरोग्य आणि भावनेपेक्षा कर्तव्य महान असतं. आजच्या काळात वर्दी मागील माणूस, त्याचे आरोग्य, त्याची अनेक पातळीवर सुरू असलेले झुंज समजून घेणे काळाची गरज झाली आहे. सकाळी सुरू झालेली ड्युटी कधी संपेल माहित नाही. सण, मोर्चा, निवडणुका, आपत्ती इथे यांची उपस्थिती अपेक्षितच असते. कडक उन्हाळा, पावसाळा, थंडी यांची तमा न बाळगता रस्त्यावर उभा असतोच, अपुरी झोप, जेवण अवेळी ..खरंतर पोलिसांच्या जीवनात घड्याळ चालतच नाही., तर परिस्थिती चालते. सेवाभावाचा पाया घेऊन आलेली ही जमात नेहमी कर्तव्य की कुटुंब या तणावात जगते. सामान्य माणूस एखाद्या वेळी एखादी घटना बघतो तर पोलीस अशा घटना म्हणजे अपघात, खून, दरोडे रोज बघतो. वर्दी मागे माणूस आहे भावना असलेला. त्यालाही वेदना होतात त्यांचा मनावर ताण येतो. त्यामुळे भावनिक थकवा, चिडचिड, अनिद्रा समाजाची निंदा, नैराश्य आणि ह्या सगळ्यांचा निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. ही मानसिक आरोग्याची समस्या गंभीर होत चालली आहे. अपचन, पाठ दुखी,सांधे दुखी, मधुमेह, बीपी सारखे आजार पोलिसांसाठी सामान्य आजार झाले आहेत. या कारणास्तव ते विश्रांती घेऊ शकत नाहीत कारण त्यांची जागा घेणारा तात्काळ उपलब्ध नसतो. पोलिसांचे आरोग्याचा समाजाशी खूप जवळचा संबंध आहे कारण वेळेवर निर्णय न घेता येने, चिडचिड होणे इत्यादी प्रकार होतात. म्हणून पोलिसांचे आरोग्य सामाजिक सुरक्षिततेचा पाया आहे.
पोलीस खाण्याच्या वेळेत शिस्त लावून घेऊच शकत नाहीत. पण आहारात घेऊ शकतात जसे की तेलकट अन्न टाळणे, मैदा युक्त पदार्थ टाळणे,स्वतः जवळ फळे आणि सुकामेवा ठेवणे. पुरेसे पाणी पिणे. चहा कॉफी टाळणे त्याऐवजी ज्यूस पिणे. हलका व्यायाम म्हणजे चालणे, दहा ते पंधरा मिनिटे सूर्यनमस्कार व स्ट्रेचिंग करणे. प्राणायाम तर जेवणाच्या दोन तासाने दिवसात केव्हाही करू शकतात.दुर्दैवाने एखादा आजार जडलाच तर दिलेली औषधं वेळेवर घेणे. लक्षात राहत नसेल तर ठराविक वेळेचा मोबाईल मध्ये अलार्म लावून ठेवणे. मिळेल तेव्हा शांत झोप घेणे.मोबाईलचा अतिवापर टाळणे. 15 ते 20 मिनिटांची झोप (पॉवर न्याप) देखील ताजी तवाने होण्यास मदत करते. कधीतरी मोकळा वेळ मिळाला तर कुटुंबा नंतर वाचन करणे, प्रेरणादायी गोष्टी ऐकणे (मोबाईलवर आज हे सगळे उपलब्ध आहे) संगीत ऐकून मन हलके होते. मित्रांशी सहकाऱ्यांशी संवाद ठेवने., आणि सगळ्यात महत्त्वाचे भावना दाबून न ठेवणे त्या मित्रांजवळ, कुटुंबाजवळ मोकळ्या कराव्या अथवा एखाद्या कागदावर लिहून काढाव्या लिहून झाल्या की तो कागद लगेच नष्ट करावा परत परत ते वाचत बसू नये. वयाच्या चाळीशी नंतर वर्षातून एक फुल बॉडी चेक अप करून घेणे गरजेचे आहे.

पोलिसांचे जीवन हे त्याग, शिस्त, जबाबदारी आणि सहनशक्ती यांचे अद्वितीय उदाहरण आहे. ते केवळ कायद्याचे रक्षक नाहीत तर समाजाचे अदृश्य आधारस्तंभ आहेत.
जय हिंद!

वर्षा दाभाडे पाटील

Posted in

Leave a comment