Book Whisper

@Weekend वाchan

I’m Varsha Patil, an avid reader and Assistant Police Sub-Inspector with the Maharashtra Police Department. I love sharing book reviews that capture the author’s intent and offer my honest opinions helping readers find meaning in stories amidst the chaos of everyday life.

माझे आवडते लेखक तात्या अर्थात आ.ह. साळुंखे सर, आधुनिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरोगामी तात्या बहुजनांचे प्रतिनिधित्व आपल्या धारदार लेखणीने आजही उत्तम रीतीने पार पाडत आहेत. आपल्या सातारी बाण्यातून परखड मत मांडायला त्यांकडूनच शिकावे.
त्यांचा कथासंग्रह वाचण्यात आला त्यांना सावलीत वाढवू नका आदेश की इशारा? काहीही समजा पण आज हे सत्य वास्तवात उतरवणे काळाची गरज वाटते. शेताच्या मधोमध उगवलेले डेरेदार झाड शेतकऱ्याचे नुकसानच करते. कारण त्या झाडाच्या सावलीला बियाणे अंकुरत नाही म्हणजेच ते वसब पडते. सूर्यप्रकाशाच्या अभावी रोप पिवळसर, खुरटलेलं अगदी आजारी माणसासारखं दिसतं. जिथे सावली नाही तिथली रोप बाळसेदार, नेटाने वाढलेली दिसतात. अगदी चपखल उदाहरण देऊन लेखक सांगतात की जीवनाच्या प्रवासात मुलांना सतत पालकांच्या छत्रछायेत ठेवू नका. त्यांची वाढ खुंटेल त्यांना जळजळीत उन्हात होरपळू देऊ नये किंवा कडक उन्हात भाजत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष ही करू नये. त्यांच्या मुळाना योग्य वेळी योग्य प्रमाणात सावली व ( मायेचा) ओलावा पण मिळाला पाहिजे. ऊन नुसता प्रकाश देत नाही तर चटकेही देते ते चटके सहन करून उन्हाचे स्वागत करायला व चटके पचवायची ताकद निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे. आज पालक मुलांना कष्ट अडचणी अपयश यांचा अनुभव येऊ देत नाहीत. त्यामुळे अशी मुले आत्मविश्वासहीन, परावलंबी व जीवन संघर्ष करण्यास असमर्थ्य ठरून अंत समयी स्वतःचे जीवन संपवतात. मुलांचा खरा विकास संघर्षातून होतो. अपयश,नकार, संकटावर मात हे संघर्षातूनच पचवायला शिकतात. संघर्षामुळेच त्यांच्यात निर्णय क्षमता,स्वावलंबन व धैर्य तयार होते.पालकांनी प्रेम मार्गदर्शन द्यावे पण आयुष्याबाबतचे, करिअर व करिअरचे निर्णय मुलांना घेऊन द्यावेत मग बघा त्यांचा वारू कसा उधळतो. चुका होऊ द्या त्यातूनच ते शिकतील. सावलीत वाढलेली मुले सुरक्षित असतात पण सक्षम नसतात. मुलांना उन्हात वाढू द्या कारण ते उन्हातच मजबूत होऊन वादळशी झुंज देऊ शकतील. सावलीतली रोप उंच होतील पण वादळ झेलू शकणार नाहीत. दुनियादारी समजू शकणार नाहीत. म्हणून आपण पालकांनी ठरवायचे आपल्या रोपाला सुरक्षित करायचे की सक्षम बनवायचे…

वर्षा दाभाडे पाटील.😊🙏🏻

Posted in

Leave a comment